पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 84 हजार 448 बालकांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले. सध्या रिक्त जागांची माहिती घेण्याचे काम सुरू असून प्रवेशासाठी आणखी आठ दिवस मुदतवाढ देण्यात येणार आहे.
नोंदणी झाल्यालेल्या 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 477 जागा आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 अर्ज आले होते. त्यातील 1 लाख 36 हजार 254 बालकांची प्रवेशासाठी निवड झाली. 70 हजार 37 बालकांचे तात्पुरते प्रवेश झाले होते.
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. अद्यापही 31 हजार 29 जागा रिक्त आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.