शहर, पिंपरी-चिंचवड, साताऱ्यात आढळले रुग्ण
पुणे – पुणे विभागातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा याठिकाणी मागील 24 तासात करोनाचे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे विभागात आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे. यामध्ये पुणे शहर 42, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापुरातील 2 बाधित रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1 हजार 839 होते. त्यापैकी 1 हजार 663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 176चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 544 नमुने निगेटीव्ह आहेत व 84 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्ण बरे झाल्यामूळे त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.
दरम्यान, विभागामधील 8 हजार 119 प्रवाशांपैकी 4 हजार 214 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून, 3 हजार 905 प्रवाशांबाबत फॉलोअप पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 10 लक्ष 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 48 लक्ष 72 हजार 779 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
उपचारांकरिता सतर्कता…
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्तांनी दिलेल्या माहीतीनुसार विभागात 1438 PPE (Personal Protective Equipment), N 95 Mask 19639 आणि 2 ply & 3 ply चे 206576 इतके mask उपलब्ध आहेत. तसेच 30 ml to 500 ml Sanitizer 115968 एवढे उपलब्ध आहेत. यानुसार शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, आपण करोना सदृश्य परिस्थितीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत. आपल्या दवाखान्याकडे येणाऱ्या रुग्णांना (SARI) सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यान्वित करण्यात आले असून त्याठिकाणी पाठविण्याची व्यवस्था करावी. संपर्क दूरध्वनी क्रमांक 020-25818323 डॉ.स्वाती बढीये (निवासी वैद्यकीय अधिकारी, कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी) 8806668747. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खासगी दवाखान्यांमध्ये जर करोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-67331307.