चित्रपटगृहातच होणार “83′ रिलीज

बॉ लीवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी “83′ चित्रपटाची प्रेक्षकांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. हा चित्रपट गतवर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता. मात्र, करोना महामारीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचीही चर्चा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनेदेखील त्यांना शानदार ऑफर दिल्या आहेत. ज्यामुळे निर्मात्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु, निर्मात्यांनी या सर्व ऑफर्स नाकारल्याचे समजते. हा चित्रपट निर्मात्यांनी सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.

हा चित्रपट भारताने जिंकलेल्या 1983मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित आहे. या ऐतिहासिक विजयाला सिल्वर स्क्रीनवर दाखविण्यासाठी निर्माते खूप उत्साहित असून ते स्क्रीनवर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत.

हा चित्रपट वर्षाअखेर डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. अशी आशा आहे की, डिसेंबरपर्यत करोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येउन चित्रपटगृहे पुन्हा खुली करण्यात येतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.