करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने अनेक चित्रपटांचे शेड्यूल बिघडले आहे. तसेच चित्रपटगृहात 50 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमांमुळे अनेक बिग बजेट असलेल्या चित्रपटांचे निर्माता हे चित्रपट रिलीज करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. कारण, कोणताही चित्रपट पहिल्या तीन दिवसांमध्ये हाउसफुल राहिल्यास पैसे वसूल होतात; परंतु तोच व्यवसाय निम्मा होणार आहे.
याचमुळे दिवाळीला प्रदर्शित होणारा “सूर्यवंशी’ चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित शेट्टी द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच अजय देवगण आणि रणवीर सिंह यांनीही यात छोटीशी भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
तसेच “83′ हा बिग बजेट चित्रपट ख्रिसमसला रिलीज करण्यात येणार आहे. तोपर्यत चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास संमती मिळण्याची निर्मात्यांना आशा आहे. यापूर्वी “सूर्यवंशी’ चित्रपटानंतर “83′ हा चित्रपट रिलीज करण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु आता “83′ हा चित्रपट आधी प्रदर्शित करण्यात येणार आहे.