पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा 23.86 टीएमसी म्हणजे 82 टक्के इतका जमा झाला आहे. खडकवासला धरणातून नदीमध्ये 3,424 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. खडकवासला यापूर्वीच 100 टक्के भरले आहे.
खडकवासला धरणातून आतापर्यंत 2.86 टीएमसी इतके पाणी नदीत सोडण्यात आले आहे. पानशेत-9.40 टीएमसी म्हणजे 89 टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात 10 टीएमसी म्हणजे 79 टक्के आणि टेमघरमध्ये 2.46 टीएमसी म्हणजे 67 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.