1 हजार 119 मतदारांनी बजावला हक्क
चिंबळी- चिंबळी (ता. खेड) येथील प्रभाग एक व प्रभाग दोनमधील रिक्त जागेसाठी रविवारी (दि. 8) झालेल्या पोटनिवडणुकीत 82 टक्के मतदान झाले. एकूण 1 हजार 375 मदारांपैकी 1 हजार 119 मतदारांनी हक्क बजावला, असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तलाठी बी. बी. पाटील यांनी यांनी सांगितले.
या दोन रिक्त जागांसाठी पाच उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले असून मतमोजणी सोमवारी(दि. 9) राजगुरूनगर येथे होणार आहे. मतदान प्रक्रीयेसाठी आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे, बीट अंमलदार पृथ्वीराज पाटील, पी. एन. बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रभाग एकमधून सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी जागेसाठी जोश शंकर जैद, चंद्रकांत बबन जैद, समीर शिवनाथ जैद तर प्रभाग दोनमध्ये ओबीसी जागेसाठी माजी आदर्श सरपंच आप्पासाहेब लोखंडे व गणेश जाधव यांचे भवितव्य सोमवारी समणार असल्याने, सगळ्यांच्या नजरा मतमोजणीकडे लागले आहे.
- कुरुळीतील एका जागेसाठी 709 मतदारांनी बजवला हक्क
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील प्रभाग पाचमधील एक रिक्त जागेसाठी 86 टक्के मतदान झाले. एकूण 823 पैकी 709 मतदारांनी हक्क बजावला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सी. सी. कारंडे यांनी सांगितले. नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष या जागेसाठी योगेश मेमाणे व बाळासाहेब बागडे यां दोघांपैकी कोणाच्या गळ्यात विजयी माळ पडते हे सोमवारी निकालानंतर समजणार आहे.