फलटण – फलटण तालुक्यातील 82 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून सासवड परिसरातील वाडी वस्तीतील 1195 लोकांसाठी पाण्याच्या टॅंकरच्या 2 खेपा मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फलटण उपविभागामध्ये कलम 25 अन्वये फलटण तालुक्यातील 82 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावीत, याबाबत पत्रव्यवहार करुन संबंधित विभागाने त्याचे आठवडानिहाय नियोजन केले असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा (जिल्हा परिषद) उपअभियंच्यांनी कळविले होते.
त्यानुसार फलटण तालुक्यातील 82 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. ही टंचाईग्रस्त गावे पुढीलप्रमाणे आहेत. कापडगाव, दुधेबावी, ताथवडा, काशिदवाडी, हिंगणगाव, टाकोबाईचीवाडी, शेरेचीवाडी (हिंगणगाव), परहर बुद्रुक, वडले, डोंबाळवाडी, तावडी, मिरढे, निरगुडी, कोरेगाव, चांभारवाडी, खुंटे, आंदरूड, गिरवी, विंचुर्णी, मिऱ्याचीवाडी, दालवडी, तडवळे, सोनवडी बुद्रुक आरडगाव, चव्हाणवाडी, तरडगाव, कुसुर, शिंदेमाळ, माळेवाडी, ढवळेवाडी (निं.), सासकल, मिरगाव, वाठार निंबाळकर, नांदल, सांगवी, खडकी, कुरवली खुर्द, झिरपवाडी, जावली, ढवळ, विठ्ठलवाडी, तरडफ, जोर पुनर्वसन (कुरवली खुर्द), आदर्की खुर्द, गोळेवाडी पुनर्वसन, फडतरवाडी, सोनवडी खुर्द, तिरकवाडी, उपळवे, घाडगेमळा, सरडे, आळजापूर, मानेवाडी, मुळीकवाडी, दर्याचीवाडी, चौधरवाडी, वाखरी, जोर पुनर्वसन (वाखरी), गोळेवाडी, आदर्की बुद्रुक, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, भिलकटी, बिबी, फरांदवाडी, सावंतवाडी, वेळोशी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, हणमंतवाडी, जाधववाडी (फ), पिराचीवाडी, घाडगेवाडी, कापशी, ठाकुरकी, सुरवडी, वाघोशी कोऱ्हाळे, जिंती, सासवड, शेरेशिंदेवाडी व नाईकबोंमवाडी. सासवड 8 वाडी वस्तीतील 1195 लोकांना एका टॅंकरद्वारे 2 खेपा पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे जगताप यांनी सांगितले .