करोना रुग्ण वाढल्यास 8 हजार बेड्स तयार

विभागीय आयुक्त राव : उपाययोजनांचा आराखडा तयार

पुणे – खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड करोना रुग्णांसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले होते. परंतु आता पुण्यासह विभागातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील बेड रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु पुन्हा रुग्ण वाढल्यास त्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रकारचे आठ हजार बेड्स सज्ज ठेवले जाणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

करोनाच्या सध्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत राव बोलत होते. यावेळी राव म्हणाले, भविष्यात रुग्ण वाढल्यास उपाययोजनासंदर्भात “आयसीएमआर’ने सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये संशियतांच्या चाचण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा आहे.

 

तसेच आता खासगी रुग्णालयातील बेड मुक्त करण्यात आले. परंतु भविष्यात रुग्ण बाधित होण्याचा दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास केवळ 72 तासांत बेड ताब्यात घेण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

 

खासगी रुग्णालयांनी करोना रुग्णांवर उपचार केल्यास शासनाने निश्चित करुन दिलेले दरानुसार बिल आकारावे लागेल. पुणे शहरातील 23 पैकी 18 कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. भविष्यात हे सेंटर सुरू करावे लागल्यास ते अल्पावधित सुरू होतील, असे नियोजन आहे, असे राव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.