इसिस दहशतवाद्यांचे 800 नातेवाईक पळाले

फ्रान्सने व्यक्‍त केली चिंता

पॅरिस: तुर्की हल्ल्यात उत्तर सीरियामधील विस्थापितांच्या छावणीतून परदेशी जिहादींचे शेकडो नातेवाईकांनी पलायन केले आहे. कुर्दिश अधिकाऱ्यांनी ही बाब कळवल्यानंतर फ्रान्सने रविवारी चिंता व्यक्‍त केली.

नक्की काय घडेल याची आम्हाला चिंता आहे आणि म्हणूनच तुर्कीने सुरुवात केलेला हल्ला लवकरात लवकर संपवावा, असे सरकारी प्रवक्त्‌या सिबेत एनडिया यांनी वृत्तवाहिनीवर सांगितले.

विस्थापित लोकांच्या छावणीजवळ तुर्कीच्या बॉम्बस्फोटामुळे इस्लामिक स्टेट गटाच्या सदस्यांचे सुमारे 800 नातेवाईक पळून गेले, असे उत्तर सीरियामधील कुर्दिश प्रशासनाने सांगितले. तुर्कीच्या या कारवाईमुळे इस्लामिक स्टेटच्या विरोधातील लढा बिघडू शकतो आणि जिहादी तुरुंगातून पळू शकतील, असा इशारा कुर्दिश अधिकारी व आघाडी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी वारंवार इशारा दिला होता.

जे पळून गेले, ते नक्की कोण होते, हे आपल्याला माहिती नाही. पण जे फ्रेंच जिहादी विदेशात पकडले गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, यावरही एनडिया यांनी जोर दिला. अमेरिकेने सैन्याला माघार घेण्याचा आदेश दिल्याबद्दल फ्रान्सने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इसिसविरूद्धच्या लढाईत एका निष्ठावंत मित्राची साथ सोडल्याची टीका केली आहे. तुर्कीच्या हल्ल्यावर टीका करत फ्रान्स आणि जर्मनीने शनिवारी तुर्कीला शस्त्रे निर्यात करणे स्थगित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.