80% स्थलांतरित कामगारांची कुठेच नोंद नाही; नीती आयोगाचा खुलासा

नवी दिल्ली – नंतर देशात स्थलांतरित कामगारांचा भूतपूर्व प्रश्न निर्माण झाला आहे 80% कामगारांची कुठेच नोंद नसल्याची बाब समोर आली आहे असे निती आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात या कामगारांची आपल्याला औपचारिक नोंद घ्यावी लागणार आहे. तरच त्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल असे निती आयोगाचे अध्यक्ष राजकुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले की हे कामगार अर्थव्यवस्थेचे चक्र चालवतात मात्र अडचणीच्या काळात या कामगारांना त्रास झाला कोरोनाव्हायरस च्या काळात इतर देशांच्या तुलनेत भारताची कमी मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे त्यामुळे आगामी काळात सर्व भारतीयांनी विकासाकडे एक चळवळ म्हणून पाहिले तर भारत जगातील दुसरी किंवा तिसरी अर्थव्यवस्था होऊ शकेल सध्या भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे.

कुमार भारतीय शिक्षक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की सध्या भारताला वेगाने पुढे जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे सरकार आणि उद्योग या दरम्यान असलेला अविश्वास कमी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.