पेशावर – पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी टीटीपीचे ८ दहशतवादी ठार केले आहेत. खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या टांक आणि तिराह या दोन जिल्ह्यांमध्ये १२ आणि १३ जानेवारीला या चकमकी झाल्या होत्या, असे आयएसआयच्या माध्यमविषयक शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यातील पहिली चकमक टांक जिल्ह्यात झाली. गुप्तचरांच्या माहीतीच्या आधारे ख्वारजी जिल्ह्यात केलेल्या कारवाईमध्ये टीटीपीचे ६ दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबान्यांना ख्वारजी म्हणून ओळखले जाते.
दुसरी चकमक खैबर जिल्ह्यातल्या तिराह खोऱ्यात झाली. त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. या परिसरात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता गृहित धरून शोधमोहीम राबवली जात आहे, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनच्या निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपुर्वी पाक सैन्याने गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे बलुचिस्तान प्रांतात कच्छी भागात केलेल्या कारवाईमध्ये तब्बल २७ दहशतवादी ठार केल्याचे म्हटले होते.