इंडोनेशियातील भूकंपात 8 ठार

मलंग  – इंडोनेशियात आलेल्या भूकंपाचा मोठा तडाखा जावा या मुख्य बेटाला बसला असून तेथे किमान आठ जण यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. किमान तेराशे इमारतींची पडझड झाली आहे. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6 इतकी झाली आहे.

भुकंपाचा केंद्र बिंदु मलंग जिल्ह्यातील सुंबरपुकुंग गावापासून 45 किमी अंतरावर होता. तथापि या भुकंपामुळे त्सुनामीची लाट निर्माण होण्याची शक्‍यता नाही असे तेथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र हा भूकंप मोठ्या क्षमतेचा असल्यामुळे डोंगर उतरावर दरडी कोसळण्याची अजून शक्‍यता असल्याने लोकांनी काही काळापुरते तरी तेथून सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

भुकंपानंतर काही भागात असे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत त्यात एक महिलाही ठार झाली आहे. भुकंपाचे हादरे बसत असतानाच्या काळातील काही व्हिडीओ क्षणचित्रे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारीत झाली आहेत. त्यात बाजार पेठा व मॉल मधील नागरीक सैरावेैरा धावत असल्याचे दिसून आले आहे. इंडोनेशियाला गेल्या जानेवारी महिन्यातही असाच 6.2 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता. त्यात 105 जण मरण पावले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.