तुमकुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील पावागडाजवळ शनिवारी एक बस उलटल्याने झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार व जखमींमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेचा तपशील अजून मिळालेला नाही.
राज्य सरकारने तेथे मदत पथक पाठवले असून जिल्हा प्रशासनालाही जखमींना मदत करण्याची सूचना करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटमध्ये या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, “कर्नाटकातील तुमकूर येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.