कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते 7 वे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान 

नवी दिल्ली – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी आज नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात सातवे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान केले. एकूण 13 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 3 लाख रुपये रोख रकमेचा जीवनगौरव पुरस्कारही समाविष्ट आहे. वर्ष वर्गवारीत 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार व्यावसायिक छायाचित्रकाराला तर 75 हजार रुपये रोख रकमेचा पुरस्कार हौशी छायाचित्रकाराला प्रदान करण्यात आला. व्यावसायिक आणि हौशी दोन्ही गटात प्रत्येकी पाच विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांची अनुक्रमे रक्कम 50 हजार आणि 30 हजार आहे.

अशोक दिलवाली यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसएल शांथ कुमार यंदाचे सर्वोत्तम व्यावसायिक छायाचित्रकार ठरले. गुरुदीप धीमण यंदाचे सर्वोत्तम हौशी छायाचित्रकार ठरले. विशेष उल्लेखनीय पुरस्कार (व्यावसायिक) – अरुण श्रीधर, पी.व्ही.सुंदरराव,कैलाश मित्तल, मिहीर सिंग, रणिता रॉय यांना मिळाला. तर विशेष उल्लेखनीय पुरस्कार (हौशी)-रवी कुमार, एस. निलीमा, मनीष जैती, महेश लोणकर, अविजित दत्ता यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राठोड यांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.