लोणी काळभोर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली. लोणी काळभोर परिसरातील केंद्रांमधूून एकूण 799 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मोमेरियल हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज या केंद्रात पृथ्वीराज कपूर ज्यूनियर कॉलेज लोणी काळभोर, एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कदमवाकवस्ती, चिंतामणी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज थेऊर, मोडक ज्यूनिअर कॉलेज वडकी आणी एमआयटी माध्यमिक शाळा व ज्यूनिअर कॉलेज पाच शाळांचे 799 परीक्षार्थी परीक्षेला बसले असून त्यांची बैठक व्यवस्था 32 खोल्यांमध्ये केली असल्याची माहिती केंद्रप्रमुख ए. बी. कचरे यांनी दिली.
दरम्यान, परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून विशेष पथकाची स्थापणा करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांची तपासणी करून तसेच त्यांची दप्तर बाहेर ठेवून त्याचेकडे मोबाइल नसल्याची खात्री झालेनंतरच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता.