मुंबई – राज्यात 531 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 331 (77 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबई उपनगर जिल्ह्यात (161 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ अमरावती, पुणे, धुळे, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. राज्यात आतापर्यंत 3 लाख 9 हजार 846 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात 112 जणांना, औरंगाबाद 75, मुंबई 71, पुणे येथे 59, नागपूर 143, सोलापूर 11 असे 471 जणांना ही लस देण्यात आली.