सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 76 नागरिकांना दहा दिवसांनतर सोमवारी घरी सोडण्यात आले. तर 404 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयीाल 50, कराड 24, फलटण 29, वाई 72, शिरवळ 40, पानमळेवाडी 34, मायणी 25, महाबळेश्वर 10, पाटण 35, दहिवडी 6 अशा एकूण 404 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 4 पुरुष, 5 महिला.,
कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथील 2 महिला, 1 पुरुष, मलकापूर येथील 2 पुरुष, 1 महिला, कोयना वसाहतीमधील 2 पुरुष, कराडच्या मंगळवार पेठेतील 1 पुरुष, रविवार पेठेतील 2 पुरुष, बुधवार पेठेतील 3 महिला, मुजावर कॉलनीतील 3 पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 1 पुरुष व 1 महिला,
उंब्रज येथील 2 पुरुष, रेठरे बुद्रुक येथील 1 पुरुष, विद्यानगर येथील 1 महिला, सैदापूर येथील 1 महिला, करवडी येथील 1 महिला, कालवडे येथील 1 महिला, मुंडे येथील 2 महिला, खासगी रुग्णालयातील 1 पुरुष, गोवारे येथील 1 महिला, कार्वे येथील 2 महिला, 1 पुरुष,
तांबवे येथील 1 महिला, 1 पुरुष, इंदोली येथील 3 पुरुष, करवडी येथील 1 महिला., खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1 पुरुष, विंग येथील 1 महिला, 1 पुरुष, खंडाळा येथील 1 महिला., खटाव तालुक्यातील वडूज येथील 1 महिला., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 1 महिला, पाचगणी येथील 2 पुरुष, 2 महिला.,
पाटण तालुक्यातील तारळे येथील 3 पुरुष, नवसारी 1 महिला, नेरले येथील 2 महिला, निगडे येथील 1 पुरुष, आंब्रग येथील 1 पुरुष, जाधववाडी चाफळ येथील 1 महिला., सातारा तालुक्यातील दिव्यनगरी शाहुपूरी येथील 1 महिला, कामाठीपुरा येथील 1 पुरुष, रामकृष्णनगर येथील 1 पुरुष, 2 महिला, देशमुख कॉलनीतील 1 पुरुष, सदरबझारमधील 1 महिला, दैवतनगर येथील 1 पुरुष., वाई तालुक्यातील शहाबाग येथील 3 पुरुष यांचा समावेश आहे.