नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एक बैठक बोलावलीय.
दिल्लीत करोना संक्रमणाच्या वाढत्या धोक्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सकाळी एक उच्च स्तरीय बैठकीचं आयोजिन केलं आहे.
या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासहीत गृह मंत्रालयाचे इतर अधिकारीही उपस्थित असतील. या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्यही उपस्थित राहतील.