खेड तालुक्यात २४ तासात तब्ब्ल ७५ पॉझिटिव्ह

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात झपाट्यांचे करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्या वाढत आहे. तालुक्यात २४ तासात ७५  करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चाकण नगरपरिषद हद्दीत २४ तासात तब्ब्ल ४३ पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने चाकण नगरपरिषद हद्दीत करोना पॉझिटिव्हची संख्या ८८ झाली आहे. तालुक्यातील एकूण संख्या ४७१ वर पोहचली आहे.

आज पासून तालुक्यात लॉकडाऊन झाले आहे मात्र पहिल्याच दिवशी तालुक्यात २४ तासात ७५ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील मृतांची संख्या १० वर पोहचली आहे. एकीकडे रुग्णाची संख्या वाढत चालल्याने तालुक्यात लॉकडाऊन सुरू झाले आहे. मात्र लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात करोनाचा हाहाकार उडाला आहे.

तालुक्यात  लॉकडाऊन होणार म्हणून गेली तीन दिवसात चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी शहरात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भाजी बाजार आणि किराणा दुकाने, मॉल मध्ये तुडुंब गर्दी झाल्याने त्याचा परिणाम दहादिवसानंतर निश्चित दिसणार असल्याचे या आकडेवारीवरून पुढे येणारआहे. तालुक्यात करोनाचे भीषण संकट आले आहे. त्याला प्रशासनाकडून पाहिजे ती काळजी घेतली जात नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे तर नागरिक काळजी घेत नसल्याचे प्रशासन सांगत आहे.

खेड तालुक्यात अनेक गावे आता संक्रमीत होत चालली आहेत. आज तालुक्याच्या ग्रामीण भागात २४ तासात ३१ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या. चाकण नगर परिषद हद्दीत ४३ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने व अजून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने चाकण हादरले आहे. नेहमी रुग्ण संख्या वाढणाऱ्या  राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत १ तर आळंदी नगर परिषद हद्दीत एकही रुग्ण न सापडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात खेड तालुक्यातील करोना बाधित व्यक्तीच्या संख्येत मोठी वाढ होत चालली आहे जिल्हाच्या ग्रामीन भागात खेड तालुका पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे आत गांभीर्य पूर्वक लक्ष देऊन कडक नियमांची मला बजावणी केले पाहिजे.

खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले कि, राजगुरूनगर येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटर मधून करोना स्वब टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे आज ३० व्यक्तीचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत येथे तीन इमारती असून एका इमारतीमध्ये १०० व्यक्तीची सोय करण्यात आली आहे. उर्वरित दोन्ही इमारतीमध्ये परिस्थितीनुसार व्यवस्था करण्यात येणार आहे. 

खेड तालुक्यात आज ३ नगर परिषदा आणि १८ गावांमध्ये कडक लॉकडाऊनपाळण्यात आले. या काळात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली सुमारे १०० व्यक्तींवर १८८ प्रमाणे कारवाई केली आहे. राजगुरूनगर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी नागरिकांनी १०० लॉकडाऊन पाळले. त्यामुळे महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता.  

खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातून विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर व डबल ट्रिपल शीट दुचाकीवरून जाणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेली तीन दिवसांपासून हि कारवाई सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे.     

खेड तालुक्याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी पुढील प्रमाणे –

तपशील  (एकूण बाधित व्यक्ती, करोनामुक्त व्यक्ती,  मृत्यूची संख्या, उपचार घेत असलेल्या व्यक्ती,  २४ तासात बाधित व्यक्ती)

ग्रामीण क्षेत्र  
३११
१७५

१३०
३१
 चाकण नगरपरिषद 
८८
१५

७१
४३
आळंदी नगरपरिषद  
३१


२६

राजगुरूनगर नगरपरिषद  
४१
१५

२५

एकूण
४७१
२०९
१०
२५२
७५

Leave A Reply

Your email address will not be published.