प्रत्यक्ष कर संकलनात 74 टक्के वाढ; अर्थमंत्र्यांकडून समाधान व्यक्त

नवी दिल्ली – कंपनी आणि नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात 74% वाढ होऊन हे कर संकलन तब्बल 5.70 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

ही आकडेवारी 1 एप्रिल ते 22 सप्टेंबरदरम्यानची आहे. यातील 3.02 लाख कोटी रुपये कंपनी करातून आले आहेत. तर 2.67 लाख कोटी रुपये प्राप्तिकरातून आले आहेत. या वाढलेल्या करसंकलनाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाधान व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची ही लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.