नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी वाहन क्षेत्राशी संबंधित बड्या उद्योगपतींशी संवाद साधला. या बैठकीत वाहन क्षेत्राला संकटापासून दूर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत वाहन क्षेत्राशी संबंधित उद्योगपतींनी कोरोना संकटाच्या वेळी ऑटो सेक्टरला भेडसावणाऱ्या समस्या विषयी अडचणी जावडेकरांनी जाणून घेतल्या.
बैठकीनंतर प्रकाश जावडेकर म्हणाले की, बैठकीत वाहन क्षेत्राच्या उत्पादनाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. लॉकडाउन संपल्यानंतर हे क्षेत्र पुन्हा कसे उघडले जाऊ शकेल यावर चर्चा करण्यात आली. उत्पादन, वाढती मागणी आणि पुरवठा, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.
“बैठकीत उद्योगाकडून अनेक सूचना आल्या आहेत. कर्मचारी जेव्हा कामावर येतात तेव्हा कंपन्यांमध्ये त्यांची चाचणी कशी करण्यात येईल. कार्यरत असताना सोशल डिस्टंशिंग कसे ठेवता येईल. वाहने खरेदी ऑनलाईन विक्री कशी करावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेथे पूर्ण स्वच्छता आहे तेथे विक्री केंद्र कसे तयार करता येईल, या सर्व गोष्टींबद्दल उद्योग प्रमुखांकडून सूचना आल्या आहेत, ”
ते म्हणाले, “ऑटो उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी ऑटो क्षेत्रातील मान्यवरांकडून करण्यात होती. या बैठकीत अवजड उद्योग राज्यमंत्री अजुरन राम मेघवाल आणि वाहन क्षेत्राशी संबंधित अनेक बड्या उद्योगपतींनी हजेरी लावली. या बैठकीस मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव, हीरो मोटर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल, टोयोटा किर्लोस्कर समूहाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष राजन वाधेरा आणि ह्युंदाई समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. किमसह बरेच आदी उपस्थित होते.