दिल्लीतील 7248 बोअरवेल सील

नवी – भूगर्भातील बेसुमार पाणी उपसा टाळण्यासाठी बोअरवेलवर कारवाई करण्याचा आग्रह राष्ट्रीय हरित लवादाने धरला आहे. त्यानुसार दिल्लीतील बेकायदा 7248 बोअरवेलवर कारवाई करून ते सील करण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाला दिली आहे.

दिल्लीत एकूण 19 हजार 661 बेकायदेशीर बोअरवेल आहेत. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 7248 बोअरवेल बंद करण्यात आल्या असल्या तरी उर्वरित बोअरवेलही त्वरित बंद करण्यात येत आहेत, असेही या मंडळाने हरित लवादाला कळवले आहे.

करोना प्रसारामुळे सध्या बोअरवेलच्या विरोधातील मोहीम काहींशी थंडावली असली तरी ती तडीला नेली जाईल असेही मंडळाने कळवले आहे. या विहिरींमधून काढण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यावरणाची नेमकी किती हानी झाली त्याचा अभ्यास करून संबंधीत बोअरवेल मालकांच्या विरोधात पर्यावरणीय नुकसानभरपाईचा दंड वसूल केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.