72 अधिकारी, कर्मचारी गोत्यात?

जात प्रमाणपत्र सादर करण्यास दिरंगाई : नोकरीवर गंडांतराची शक्‍यता

पिंपरी – पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 72 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांना अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवारी (दि.27) पर्यंतची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या 18 मे 2013 च्या परिपत्रकानुसार महापालिका आस्थापनेवरील राखीव व खुल्या प्रवर्गातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यापही अर्ज पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 मधील कलम 8 नुसार, आपण विशिष्ट जातीचे किंवा जमातीचे आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे.

राखीव व खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 27 एप्रिलपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा कोणतीही नोटीस न देता त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

“त्यांच्या’वर होणार कारवाई
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र आणून देण्यास सुरुवात केलेली आहे. महापालिकेत सुमारे 323 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत अद्याप पाठपुरावा सुरु आहे. परंतु, काही कर्मचाऱ्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अद्याप संबंधित जात पडताळणी समितीने दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. मात्र, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे समितीने प्रमाणपत्र सादर करुनही ते महापालिकेत सादर न केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)