जाधवाडी- कोरोनाच्या संकटातून आपल गाव वाचवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील जाधववाडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावच्या सुरक्षेसाठी ६५ ते ७० हजार रुपये खर्च करून सर्व गावात २ ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषधाची फवारणी करून संपुर्ण गाव निर्जंतुक केला तसेच तर गावातील सर्व नागरिकांना गावातील तरुण उद्योजक रोहित नरवडे मास्क चे वाटप केले. नरवडे यांनी ५ हजार मास्क व १ हजार सॅनिटायजर बॉटल जाधवाडी, वडगाव आनंद ग्रामपंचायती मधील सर्व नागरिक तसेच आळेफाटा येथील पेट्रोल पंप कर्मचारी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर यांना मोफत वाटप केले.
आळेफाटा,पिंपळवंडी, आळे येथील बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त करून देऊन १० दिवसात ५ हजार मास्क बनून घेऊन वाटप केले.