सिंधूसोबत लग्न करण्यासाठी 70 वर्षाच्या आजोबांची याचिका

परवानगी न मिळाल्यास पळवून नेण्याची धमकी
रामनाथपूरम (तामिळनाडू): भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूसोबत लग्न करण्याची 70 वर्षांच्या आजोबांनी इच्छा व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी आपल्याला 24 वर्षीय पी व्ही सिंधूसोबत लग्न करायचे असल्याच सांगितल आहे. मलाईस्वामी अस या आजोबांचे नाव आहे.

मलाईस्वामी यांनी जर लग्नासाठी योग्य तयारी करण्यात आली नाही तर आपण पी व्ही सिंधूच अपहरण करु आणि लग्न करु अशी धमकीही दिली आहे. जिल्हाधिकारी दर आठवड्याला लोकांची भेट घेत असतात. यावेळी लोक याचिका दाखल करत त्यांच्या समस्या मांडू शकतात. याचवेळी मलाईस्वामी यांनी ही याचिका केली आहे. मलाईस्वामी यांनी आपला आणि पी व्ही सिंधूचा फोटो एका बंद लिफाफ्यात सादर करत जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला पी व्ही सिंधूसोबत लग्न करायच असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपला जन्म 4 एप्रिल 2004 रोजी झाला असून आपण फक्त 16 वर्षांचे असल्याचा अजब दावाही यावेळी केला. सिंधूने ज्याप्रकारे आपल्या करिअरमध्ये यशाची उंची गाठली आहे ते पाहून आपण प्रचंड प्रभावित झालो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here