छत्रपती संभाजीनगर – सण, उत्सव असल्यामुळे विविध शॉपिंग कंपन्यांनी ऑनलाइन खरेदीवर (Online Shopping) आकर्षक सुट, बक्षिस व क्रेडिट कार्डवर कॅशबॅकच्या ऑफर दिल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी ऑनलाइन साईटवरुन खरेदी केली. या संधीचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी शहरातील शेकडो नागरीकांना ऑनलाइन गंडवले. (Online Fraud)
याशिवाय मागील 10 महिन्यांत हनीट्रॅप, ऑनलाइन टास्क, इंस्टंट लोण, ऑनलाइन जॉब, ऑनलाइन डिमांड, घरबसल्या नोकरीचे आमिष, इलेक्ट्रिक लाईट कट करणे आदी कारण सांगत हजारो नागरीकांना गंडवण्यात आले आहे. मागील 10 महिन्यांत सायबर शाखेला 111 नागरीकांचे 70 लाख रूपये परत मिळविण्यात यश आल्याची माहिती सायबर पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. (Chhatrapati Sambhajinagar)
111 तक्रारदारांचे 70 लाख रुपये हे विविध राज्यातून वसुल करण्यात आले आहेत. 31 लाख रुपये झारखंड राज्यातून, 16 लाख रूपये नोएडातुन तर 14 लाख रूपये दिल्लीतून वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ऑनलाईन लॉट्री, टास्क, रिव्हु अशा प्रलोभनांना बळी पडू नये तसेच मोबाईल प्राप्त झालेल्या अनोळखी लिंकला क्लिक करू नये असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, महेश उगले, वाघचौरे व त्यांच्या पथकाने केली आहे.