सशस्त्र दलांमधून निवृत्त 7 अधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – सशस्त्र दलांच्या 7 निवृत्त अधिकाऱ्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये लष्कराचे माजी उपप्रमुख जे.बी.एस.यादव आणि एस.के.पट्याल यांचाही समावेश आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. आर.एन.सिंह, सुनीत कुमार, नितीन कोहली या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच आर.के.त्रिपाठी आणि नवनीत मागोन या हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांत समावेश आहे. निवृत्त अधिकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सीतारामन यांनी ते पक्षाला राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीशी संबंधित धोरणांवर मार्गदर्शन करू शकतात, अशी भावना व्यक्त केली. तर संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. निवडणूक हंगामात याआधी भाजपमध्ये विविध क्षेत्रांतील सिलेब्रिटींनीही प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.