झुनझुनू – तरूणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत दोन सख्या बहिणींवर सात नराधामांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे मागील दीड वर्षापासून या बहिणींवर अत्याचार करण्यात येत असून धाकटी बहीण गरोदर झाली आहे. हा प्रकार राजस्थानमधील झुनझुनू येथे घडला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पीडितेच्या भावाने येथील नवलगढ पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून पोलीसांनी सात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकास ताब्यात घेतले आहे. विक्की कायमखानी, असलम उर्फ मोंटी, जावेद कायमखानी, शफीक, सुमित उर्फ टोनी रणवां, विकास जाट आणि धोलू खान अशी या नराधामांची नावे आहेत. आरोपी तरुणांच्या संपर्कात असलेल्या इतर तीन-चार तरुणांची पोलीस चौकशी करत आहेत.
पीडितेच्या भावाने फिर्यादीमध्ये सांगितले की, मागील दीड वर्षांपासून हे आरोपी त्याच्या बहिणींसोबत दुष्कृत्य करत आहेत. आरोपींनी आधी मोठ्या बहिणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि जर याबाबत कुणाला सांगितले तर हा व्हिडीओ सार्वजनिक करण्यात येईल, अशी धमकी दिली. तसेच मोठ्या बहिणीवर दबाव टाकत म्हटले की, तुझ्या छोट्या बहिणीला बोलावले तर आम्ही तुला सोडून देऊ. असे म्हणत तीच्यावरही अत्याचार केले. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
2021 मध्ये आरोपींनी एका लग्नादरम्यान धाकट्या बहिणीसोबत अत्याचार केले. त्यावेळी ती अल्पवयीन असून ती दहावीत शिकत होती. त्यानंतरही तिचे लैंगिक शोषण करण्यात असता ती गर्भवती राहीली. गरोदर असल्यामुळे तिला परीक्षेला सुद्दा बसता आले नाही. या सर्व प्रकार कळताच आरोपी ढोलू खान याने तिला गर्भपाताची गोळी आणून दिली आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र लहान बहिणीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आली.