पुणे – सिंहगड कॉलेजची सीमाभिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून 7 जणांनी दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
याप्रकरणी सखाराम कोंढरे, प्रकाश कोंढरे, स्वाती राजू घारे उर्फ स्वाती कोंढरे, चिंटू उर्फ चिमाजी कोंढरे, संजय कोंढरे, लक्ष्मी कोंढरे उर्फ जयश्री काटे, बायडाबाई उर्फ हिराबाई कोंढरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला. त्यांच्यातर्फे ऍड. सुशीलकुमार पिसे, ऍड. सचिन शिर्के यांनी बाजू मांडली. आंबेगाव बुद्रुक येथे सर्व्हे क्रमांक 10/10 येथे सखाराम कोंढरे यांच्या 19 गुंठे जागेत बिल्डर दांगट यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीशेजारी मोकळ्या जागेत मजुरांना राहण्यासाठी सिंहगडच्या सीमाभिंतीलगत सहा ते सात झोपड्या आहेत. यात सीमाभिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.