पीएमपीच्या महसुलात 7 लाखांनी वाढ

पुणे – पुणे परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) रक्षाबंधनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी 120 जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या माध्यमातून पीएमपीला एकाच दिवसात 1 कोटी 67 लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपी 7 लाखांनी नफ्यात आहे.

गेल्या वर्षी रक्षाबंधनादिवशी पीएमपीचे 1 कोटी 60 लाख उत्पन्न जमा झाले होते. यंदा पीएमपीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित व जादा अशा एकूण 1,693 गाड्या सोडलेल्या होत्या. यामधून पीएमपीला 1 कोटी 67 लाखांचे उत्पन्न मिळाल्याने 7 लाखांनी महसूल वाढला आहे. जादा गाड्यांमध्ये नुकत्याच उद्‌घाटन केलेल्या ई-बस व सीएनजी बसचाही समावेश असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.