अहमदाबाद – गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी मानकुवार परिसरातील मार्गावर घडला.
हा अपघात एवढा भीषण होता की त्यात रिक्षाचा अक्षरश चेंदामेंदा झाला आहे. तर रिक्षामधील 7 प्रवासी जागीच ठार झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या 10 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच अपघातग्रस्त रिक्षामधील प्रवासी कठून कुठे जात होते याची देखील माहिती अद्याप कळू शकलेली नाही.