पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 7 जणांचा खात्मा

जम्मू : काश्‍मीरच्या केरन सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेवरील एका सीमा चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तान बॉर्डर ऍक्‍शन टीमचा (बॅट) प्रयत्न लष्कराने शनिवारी हाणून पाडला. त्यात 7 घुसखोरांना ठार मारले. बॅटमध्ये सहसा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचे कर्मचारी आणि दहशतवादी यांचा समावेश असतो.

कुपवाडा जिल्ह्याच्या केरन सेक्‍टरमधील एका सीमा चौकीवर हल्ल्याचा बॅटने केलेला प्रयत्न आमच्या दक्ष जवानांनी हाणून पाडला. यात पाकिस्तानचे सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी मिळून 5 ते 7 जण ठार झाले, असे संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. 31 जुलै व 1 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री बॅटने हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. केरन सेक्‍टरमधील सीमा चौकीनजीक किमान 4 मृतदेह दिसून आले असून, ते पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सव्र्हिस ग्रुपचे (एससजी) कमांडो किंवा दहशतवाद्यांचे असावेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे मृतदेह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांमध्ये पाक फौजा अडथळे आणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.