पुणे –करोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच “ओमायक्रॉन’ या करोना विषाणूच्या नव्या आवृत्तीने पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण केले आहे. त्यातच पिंपरीमध्ये सहा तर पुणे शहरात एकाला “ओमायक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पालिका आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. या सात नव्या बाधितांमुळे राज्यात आता “ओमायक्रॉन’ संसर्गितांची संख्या आठ झाली आहे.
करोना संसर्ग झालेला पहिला रुग्णही राज्यात प्रथम पुण्यातच सापडला होता. “ओमायक्रॉन’ची लागण झालेला राज्यातील पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला; परंतु पुणे जिल्ह्यात थेट सात जण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या 12 आणि 18 वर्षीय दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे. याशिवाय पुणे शहरातील ४७ वर्षीय | पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनआयव्ही) च्या अहवालातून सिद्ध झाले आहे.
पिंपरी मध्ये सापडलेल्या बाधितांमधील तीन जण नायजेरियातून आले आहेत तर तिघे त्यांचे निकटवर्ती असून, या तिर्धीच्या कॉन्टैक्टमधून त्यांना लागण झाली आहे. या तिर्धीच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या करोना बाधित आल्या होत्या. त्यानंतर त्या सगळ्यांचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ केले असता मनाविरुद्ध त्यांच्यात ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. लेखकाने लि नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत.
या सहा जणांपैकी अभिव्यक्ती तिघे हे २८ वर्षांखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतली नाही. आहे आणि अ उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पुणे शहरातील ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून, हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो करोना बाधित आढळला. त्याने की विशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून, सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे आवाहन
या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून, याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात करोना अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आम्ही काळजी घेत आहोत – महापौर
पुणे शहरातील “ओमायक्रॉन’बाधित रुग्णाला लक्षणे नाहीत. त्यामुळे त्याला गृहविलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यात “ओमायक्रॉन’चा बाधित सापडलेला रुग्ण ज्या गृहनिर्माण सोसायटीत राहतो, त्या सोसायटीतील सर्व घरांमधील सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली आहे. या रुग्णाला लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे त्याला गृहविलगीकरणातच ठेवले आहे. त्याच्या संबंधित असलेल्या सर्व नातेवाईक आणि अन्य नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले आहे. त्यांच्याही “आरटीपीसीआर’ टेस्ट करण्यात आल्या असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.