अमरावती – खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कुटुंबियांवर कोरोना संकट ओढवलं आहे. राणा कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची यांचा समावेश आहे. याखेरीज रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही कोरोना झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, राणा कुटुंबातील कोरोनाबाधितांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं असून रवी व नवनीत राणा यांच्यासह इतर काही सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलंय.
याबाबतची माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे.
रवी राणा म्हणतात…
“आज माझे कुटुंब करोनाच्या संकटात सापडे आहे. माझे आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, भाची आणि एका अंगरक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. आमची विचारपूस करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तरीही या काळात सगळ्यांनीच योग्य ती काळजी घ्यावी. गर्दी करु नये, करोनाशी लढाई आपल्याला जिंकायची आहे.”