राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटींची तरतूद

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटी रुपयांची तरतूद केली आह. यामुळे राज्यातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली.
प्रभू म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेसाठीच्या निधीतही वाढ केली आहे. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत लक्षात आणून दिली. तसेच आपणही निधी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विलंब न करता अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली.
राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, असही प्रभू यांनी सांगितले.





