प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी या टिव्हीवरील हिट जोडीने गेल्यावर्षी 12 ऑक्टोबरला लग्न केले. त्यांनी आपल्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकही संधी सोडली नाही. लग्नानंतर 2 ऑगस्टला युविकाचा पहिल्यांदाच वाढदिवस आला होता. प्रिन्स नरुलाने आपल्या बायकोसाठी एका सरप्राईज पार्टीचे आयोजन केले होते. प्रिन्सने युविकासाठी तब्बल 7 फ्लेव्हर्सचे 7 वेगवेगळे केक बनवून घेतले होते. प्रत्येक केकवर “युविका’च्या स्पेलिंगचे प्रत्येक अक्षर लिहीले होते. तर अखेरच्या केकवर मेकअप ऍक्सेसरीजमध्ये सजवला होता. या पार्टीच्यावेळी युविका आणि प्रिन्स नरुला प्रचंड खुशीत दिसत होते.