नवी दिल्ली – अमेरिकेच्या अलास्का प्रांतात सोमवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल एवढी तीव्र होती. यानंतर त्सुनामीचा धोका असल्याने अलर्ट केले होते.
अलास्का येथील समुद्र किनाऱ्यावर 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. समुद्रतटावर राहणाऱ्या नागरिकांना उंच ठिकाणी आश्रय घेण्याबाबतही सांगण्यात आले होते. काही ठिकाणी 1.5 ते 2 फूट उंच त्सुनामीच्या लाटा देखील आल्या.
अमेरिकेच्या एजन्सीनुसार, हा भूकंप जमिनीपासून 41किमी खाली सॅड पॉइंट शहरापासून 94 किमी अंतरावर झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला. पहिल्या भूकंपानंतर आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले, याची तीव्रता 5 पेक्षा जास्त होती.
दरम्यान, भूकंपानंतर एजन्सीने त्सुनामीचा इशारा दिला होता. परंतु, सॅंड पॉईंटच्या काही ठिकाणी त्सुनामीच्या छोट्या लाटा दिसल्याने हा इशारा सल्लागारात बदलला आहे.