उपबाजारात 6oo गाडी शेतीमालाची आवक

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील फळे भाजीपालाचा मुख्य बाजार साप्ताहिक सुट्टी मुळे बंद आहे. तरीही, मांजरी, मोशी, उत्तमनगर आणि खडकी येथील उपबाजारात शनिवारी तब्बल 600 गाड्या फळे आणि भाजीपाल्याची आवक झाली. त्याची खरेदीदारांनी खरेदी केली.

त्यामुळे कोणीही ही पॅनिक होऊ नये. शहरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. दरम्यान, रविवारी पुणे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला विभाग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, बाजार पूर्णपणे सुरळीत सुरू झाला आहे. ठोक विक्रेते येऊन भाज्यांची खरेदी करत असून, ते बाहेर किरकोळ विक्री करत आहेत.

बाजार आवारात केवळ ठोक विक्रेत्यांनी यावे, घरगुती आणि इतर खरेदीदारांनी गर्दी करू नये. त्यांनी घराजवळ उपलब्ध असलेल्या किरकोळ विक्रेत्याकडूनच भाजी खरेदी करावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून बाजारातील व्यवहार सुरू आहेत. शहरात कोणत्याही परिस्थितीत भाजीपाला आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही. बाजार समिती नागरिकांना भाजीपाला आणि अन्य अन्नधान्याचा पुरवठा करण्यास बांधील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.