कोरेगावात वाळू उपसाप्रकरणी 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा  – कोरेगाव येथे वसना नदीपात्रात मळवी नावाच्या शिवार परिसरात आठ हजार रुपये किमतीची पाऊण ब्रास वाळूचे अवैध उपसा केल्या प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणी चार दुचाकी सहा मोबाईल हॅंडसेट व फॉर्चुनर गाडी असा 69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार सत्यवान मधुकर बसवंत यांनी या अवैध उपसाप्रकरणी तक्रार दिली आहे. राजू रतन सिंग जाधव (वय 23), मधुबाई तांडा (रा. विजापूर), करण भारत फडतरे (वय 27), अजय बबन फडतरे (वय 40, रा. हनुमाननगर कोरेगाव) इंद्रजित बजी रंग जाधव (वय 22, भाकरवाडी), सुधीर बळवंत बर्गे (वय 27), भाकरवाडी कोरेगाव, दीपक विष्णू ढेरे (वय 47), हनुमाननगर, रोहन भारत फडतरे (वय 27, हनुमाननगर) या सात जणांना अटक करण्यात आली आहे.

यातील एक अन्य आरोपी संजय लक्ष्मण पिसाळ (वय 52, शांतीनगर, कोरेगाव) हा उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. सातारा उपविभागीय अधिकारी समीर शेख यांना वसना नदीच्या पात्रात चोरटी वाळू वाहतुकीची माहिती मिळाली होती. शेख यांनी आपले पथक व कोरेगाव पोलीस असा संयुक्त छापा मळवी नावाच्या शिवारात घातला. त्यावेळी घटनास्थळावर कोरेगावातील काही  बड्या हस्तींसह अकरा जण तेथे उपस्थित होते. चौघांनी कारवाई दरम्यान तेथून पळ काढला. एक विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. घटनास्थळावरून एक जेसीबी एक ट्रॅक्‍टर, फॉर्चुनर गाडी, पाच दुचाकी व सहा मोबाईल असा 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संगनमताने बेकायदा वाळू उपसा व चोरट्या वाहतुकीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here