पुणे – साखर कारखान्यांना 689 कोटींचे कर्ज मंजूर

पुणे – साखरेचा उठाव होत नसल्याने केंद्राने सॉफ्टलोन घेण्यास साखर कारखान्याला परवानगी दिल्याने राज्यातील 42 साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेने 689 कोटी 2 लाख 79 हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे.

यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. याशिवाय मागील वर्षीच्या गाळपाची कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे कठीण झाले आहे. साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांकडून सॉफ्टलोन घेण्यास परवानगी मागितली होती. केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास परवानगी दिली आहे. राज्य बॅंकेने राज्यातील 42 कारखान्यांना 689 कोटी 2 लाख 79 हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. या कर्जावरील एक वर्षाचे व्याज हे केंद्र सरकार भरणार आहे.

विघ्नहर जुन्नर, जवाहर शेतकरी, छत्रपती शाहू कोल्हापूर, शरद नरंदे, कुंभारी-कासारी, दत्त इंडिया, शरयू ऍग्रो, आर. पवार शिरुर, जयवंत शुगर, विश्वासराव शुगर,संजीवनी अहमदनगर, भाऊराव चव्हाण नांदेड, एस.एम. मंडलिक, लोकनेते सुुंदरराव सोळंखे, किसनवीर सातारा, सद्‌गुरू सांगली, सिद्धी शुगर, पूर्णा हिंगोली, समर्थ, प्रसाद शुगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पराग ऍग्रो, संत तुकाराम, अशोक अहमदनगर, किसनवीर खंडाळा, उटेक शुगर, भाऊराव चव्हाण युनिट-, धाराशिव युनिट-, पूर्णा हिंगोली युनिट-, तुकाई हिंगोली, समर्थ युनिट-, काडवा नाशिक, छत्रपती माजलगाव, भाऊराव चव्हाण युनिट-, राजगड सहकारी, श्री.क्रांती शुगर, ग्रीन पॉवर शुगर, धाराशिव युनिट- या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे. दरम्यान, महिनाअखेर मुदत यापैकी 18 साखर कारखान्यांनी 169 कोटी 68 लाख 75 हजार रुपये कर्ज उचलले असून अन्य कारखान्यांना राज्य शासनाचे हमीपत्र, कारखान्यांकडून अन्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर कर्ज वितरित केले जाणार आहे. 31 मेपर्यंत कर्ज उचलण्यास साखर आयुक्तांनी मुदत दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.