करोना लसीकरणानंतर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशातील पहिली घटना

नवी दिल्ली – करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशात वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना नोंदली गेली आहे. सरकारकडून नेमलेल्या समितीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर उद्भवलेल्या 31 गंभीर घटनांचा अभ्यास केला आणि यापैकी केवळ 1 मृत्यू हा लसीकरणामुळं झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृतरित्या एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही त्रासाला एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्युनाइजेशन (AEFI)असे म्हटले जाते. सरकारकडून अशा AEFIच्या प्रकरणांसाठी एक समिती स्थापन केली आहे. त्यानुसार, 8 मार्च 2021 रोजी लसीकरणानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा एनाफिलेक्सिसमुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर एईएफआय झाल्याच्या घटना एकूण लसीकरणाच्या केवळ 0.01 टक्के एवढ्या आहेत.

एईएफआयच्या 26,200 प्रकरणांची नोंद –

लसीकरणानंतर देशात पहिला मृत्यू झाला आहे. या 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू लस घेतल्यानंतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्याला लसीचा असा साईड इफेक्ट झाला असण्याची शक्यता आहे. लसीच्या साईड इफेक्टमध्ये अॅलर्जी आणि एनाफिलेक्सिसचा समावेश आहे, असे समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणाले. त्यांनी याबाबत मिरर नाऊला माहिती दिली आहे. एनाफिलेक्सिसच्या इतर 2 घटनांमध्ये 19 आणि 16 जानेवारी लसीकरण करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, उपचारानंतर ते बरे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.