67th National Film Awards : सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान

मुंबई – साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड म्हणजेच, अभिनेते रजनीकांत’यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आज (दि. 25) दिल्लीत रंगलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रजनीकांत यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्याच बरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांना

अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या पुरस्कांराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता धनुष देखील या सोहळ्याला उपस्थित होता.

कंगना राणावतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तर अभिनेता धनुषला ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयीला ‘भोसले’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.