सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून गुरूवारी संध्याकाळपर्यंत 670 नागरिकांना घरी सोडण्यात आले. तर 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 16, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 35, फलटण उपजिल्हा रुग्णालय 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगाव 80, पानमळेवाडी 73, मायणी 56, महाबळेश्वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 128 अशा एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.