सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 जणांना दहा दिवसांनतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले. तर 464 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील शहरातील शनिवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 33, 52, 33, 28, 33, 25 वर्षीय पुरुष व 1 महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष व 30, 36 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 26 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय महिला,
कोयना वसाहत येथील 20 वर्षीय युवक., पाटण तालुक्यातील निगडे येथील 60 वर्षीय महिला, चाफळ येथील 6 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 2 वर्षीय बालिका व 25 वर्षीय महिला, नेरले येथील 2 महिला व 63 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालिका, अंब्रग येथील 58, 27, 29 वर्षीय पुरुष व 50, 25 वर्षीय महिला, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, तारळे येथील 4 वर्षीय बालक., वाई तालुक्यातील वाई शहरातील 46 वर्षीय पुरुष, 16, 11 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, करोना केअर सेंटरमधील 34,
48 वर्षीय पुरुष, शाहबाग येथील 32, 35, 53 वर्षीय पुरुष, शांतीनगर येथील 45, 15, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष., जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सातारा शहरातील सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 54 वर्षीय महिला व 5, 2, 9 वर्षीय बालिका,
9, 5 वर्षीय बालक, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 40, 60 वर्षीय महिला व 24, 35 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 84, 14, 42 वर्षीय पुरुष., कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 9, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 3, कोरेगाव 12, वाई 29, शिरवळ-खंडाळा 76, रायगाव 21, पानमळेवाडी 107, मायणी 39, महाबळेश्वर 11, पाटण 43, दहिवडी 12, खावली 3, कृष्णा हॉस्पिटलमधील 62 अशा एकूण 464 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे व कराड येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.