वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दहशतवादी संघटनेत मूळ भारतीय वंशाचे 66 भारतीय कार्यरत आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या दहशतवादाशी संबंधित एका अहवालात देण्यात आली आहे. ही नोव्हेंबर महिन्यातील माहिती आहे. यातील एकाही दहशतवाद्याला भारतात घालवून देण्यात आलेले नाही.
दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत आणि अमेरिकेत व्यापक सहकार्य सुरू आहे. दोन्ही देशांनी काऊंटर टेरिझम वर्किंग ग्रुप कार्यरत आहे. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात या विषयावर आतापर्यंत तीन टु प्लस टु चर्चा झाल्या आहेत. भारतातील दहशतवादी कारवायांवर एनआयए ही संस्था प्रभावीपणे कार्यत आहे प्रादेशिक दहशतवादी गटांवर त्यांनी चांगले नियंत्रण मिळवले आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
एनआयएने दहशतवादाशी संबंधित 34 घटनांचा तपशिलाने तपास करून 160 जणांना या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत अटक केली आहे. त्यातील दहा जण अल-कायदाशी संबंधित आहेत. एनआयएच्या कार्याची तपशिलाने माहिती अमेरिकेच्या या अहवालात देण्यात आली आहे.