विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्‍ती

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 7 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव सोनवणे यांची शनिवारी नियुक्‍ती करण्यात आली. याबाबतची घोषणा विद्यापीठाने आज जाहीर केली. डॉ. संजीव सोनवणे हे सध्या पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभागप्रमुख आणि मुक्‍त अध्ययन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा पदासाठी आज मुलाखती झाल्या. या पदासाठी पाच उमेदवार पात्र होते. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होताच सायंकाळी विद्यापीठाने अधिकृतरीत्या डॉ. संजीव सोनवणे यांची या विद्याशाखा पदासाठी नियुक्‍ती करण्यात आल्याचे जाहीर केले.
डॉ. सोनवणे यांना शिक्षणशास्त्र विषयाचा 32 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते सध्या गेल्या 13 वर्षांपासून विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख कार्यरत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत पुणे विद्यापीठात दोन वेळा अधिष्ठाता, दोन वेळा व्यवस्थापन परिषद सदस्य होते. 20 वर्षे विद्या परिषदेचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे “नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्यूकेशन’चे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

विद्यापीठ व महाविद्यालयात विषय अध्यापनात व संशोधनामध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रूजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोणताही प्रश्‍न सोडविण्यासाठी अथवा समस्या निराकरणासाठी एकच विषयाचा अभ्यास पुरेसा नाही. त्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून अन्य विषयांचा अभ्यासाच्या समावेशाने उत्तर शोधता येते. त्यादृष्टीने अध्यापक व संशोधनाला दिशा जाईल.

डॉ. संजीव सोनवणे

Leave A Reply

Your email address will not be published.