सोलापूरमधील 114 छावण्यांत 65 हजार जनावरे

सांगोल्यात सर्वाधिक 66 छावण्या

सोलापूर – जिल्ह्यात एप्रिलअखेर 114 चारा छावण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सांगोला तालुक्‍यात 66 छावण्या आहेत. या छावण्यांमध्ये 65 हजार जनावरांचा समावेश आहे. दरम्यान, मे महिन्याअखेर चारा छावण्यांची संख्या 200 पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

करमाळा तालुक्‍यात 8 छावण्यांत 3 हजार 648, मंगळवेढा तालुक्‍यात 38 छावण्यांमध्ये 19 हजार 515, सांगोला तालुक्‍यातील 66 छावण्यांमध्ये 40 हजार 605, तर बार्शी तालुक्‍यातील 2 छावण्यांमध्ये 1435 जनावरांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्‍यात 3, मोहोळ तालुक्‍यात 2, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 4 तर पंढरपूर तालुक्‍यात आणखी तीन छावण्या मंजूर असून येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे पुरवठा खात्याकडून सांगण्यात आले. या छावण्यांमध्ये 50 हजार 970 मोठी, तर 14 हजार लहान जनावरे आहेत. शासनाकडून मोठ्या जनावरास प्रती दिन 90, तर लहान जनावरास 45 रुपये चाऱ्यासाठी अनुदान आहे.

चारा छावण्या सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील 124 गावांतून 222 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 112 गावांमध्ये 182 चारा छावण्या सुरू करण्यासाठी समितीने शिफारस केली होती. यापैकी 132 गावांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिली असून त्यापैकी 114 छावण्या सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.