पाथर्डी – शहरातील लकार गल्लीत राहणारे सोन्याचे व्यापारी राम चिंतामणी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून सुमारे 64 हजाराचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याबाबत चिंतामणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील लकार गल्लीत चिंतामणी आपल्या परिवारासमवेत राहतात. नवीपेठेत त्यांचे चिंतामणी सराफ नावाचे सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री चिंतामणी परिवारातील सदस्य जेवण करून झोपले होते. 15 ऑगस्ट रोजी सकाळी चिंतामणी यांनी बेडरूममध्ये पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी उचकापाचक करून लाकडी फर्निचरच्या ड्रॉवरच चोरून नेल्याची लक्षात आले. घराच्या गच्चीवर चोरट्यांनी लाकडी ड्रावर मधील गंठण नेकलेस, झुंबर असे 64 हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने काढून ड्रावर तिथेच टाकून दिला.