जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा खात्मा ३८ महिन्यांत

जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. त्यांनी सांगितले की, यादरम्यान ४०० एन्काऊंटर्स झाले असून यामध्ये ८५ जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्या प्रश्नाला राय उत्तर देत होते.

नित्यानंद राय पुढे म्हणाले की, ‘दहशतवाद्यांबाबत सरकारची जीरो टॉलिरेंस धोरण आहे. सरकारकडून येथे सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशद्रोही घटनांविरोधात कडक कायदे लागू करण्यात आले आहेत. तसेच दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी सातत्याने शोधमोहिम राबवली जात आहे. दहशतवाद्यांना जे लोकं मदत करत आहेत, त्यांच्यावर सुरक्षा दल बारीक नजर ठेवून आहेत. यासोबत त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.

जून २०२१ पर्यंत पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार करून जम्मू -काश्मीरमध्ये ६६४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दरम्यान मार्च महिन्यात येथे सीमेपलीकडून गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना घडल्या नाही झाली.

द्रमुकचे खासदार तिरुची सिवा यांच्या उत्तरात त्यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘२०१९ मध्ये जम्मू -काश्मीरमध्ये यूएपीए कायद्यांतर्गत १ हजार ९४८ लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय ३४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.