मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी पडद्यावर ‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2 हे आणल्यानंतर आता ते ‘गर्ल्स’ चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. ‘गर्ल्स’ या चित्रपटातून मुलींची धमाल, त्यांच लाईफ, त्यांचे गॉसिपिंगचे विषय या सर्व गोष्टी पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा भन्नाट टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
दरम्यान, या टीझरमध्ये ‘बॉईज’ या अफलातून ‘गर्ल्स’ची ओळख करून देताना पहायला मिळत आहेत. मुली काहीच करू शकत नाहीत, असे सांगणाऱ्या या ‘बॉईज’ना या ‘गर्ल्स’ अतिशय चपखल उत्तर देत आहेत. मनमुराद जगणे, राडा घालणे, धमाल-मस्ती करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. ‘हम भी किसीसे कम नही’ अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत. 29 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेे.